सोमवार, २६ डिसेंबर, २०११

द्यावे आता श्रोती इकडेच ध्यान
भारत गुणगान आळवितो

जाती-धर्म दंगे भ्रष्ट बलात्कारी
वसती  जिथे सुखे तो एक भारत

विद्यार्थी कृषक भासती मूषक
मद्याचे  चषक चहूकडे

पैशाचे कारण सत्तेचे कारण
स्वार्थाचे कारण राजकारण म्हणती

सत्तांध पुढारी गुंडांचा हैदोस
दोहोंचा तारक पक्ष असे

पैसा-गाडी-घर मिळे अल्पावधीत
तो राजधर्म नवश्रीमंतांचा

जातीकरण धर्मकारण
नामकरणविधी राजकारण्यांचा

माणसे गारगोटी झाली ज्यांचा हाती
संघर्ष पेतवाया समाजात

चारित्र्य ज्याचे विष्ठेमाजी न्हाले
अंगावरी खादीच्या  डाग नाही

शरीर एक डोके एक
डोक्यावरी  टोप्या सर्वपक्षी

सामान्यांचा  आकांत जेवणाची भ्रांत
जया न ये दिसून तो पुढारी

सदा असे फटकून सदा असे हटकून
सगळी ज्या वचकून तो पुढारी

काही आजी असती काही माजी असती
सगळ्यांची लोळण पैशामध्ये

शेती-शेतकरी मेलेत कधीचे
कोरे सातबारे खरोखरी

पापाचरणी - कृतघ्नी
असत्यावचनी खोटे - नाटे

भाषणात ज्यांच्या गरिबांची  कणव
आचरण मात्र कुत्रे 'उद्योगींचे'

पक्षनिष्ठा  राजनिष्ठा नाही
सत्तेसाठी काही मलमूत्र प्यावे

फार आमदार काहीएक नामदार
सगळ्यांचा आधार मुख्यमंत्री

भूखंड विकावे टेंडर  विकावे
सत्तापैशाकारणे आईबहीण

जे जे मिळेल ते ते खावे
थोर लहान काही न पाहावे
शहिदांचे मुडदे राजकारणा पडावे
भोसडीचे

ह्यांचा नको  सहवास ह्याचा नको घास
सगळेच असती भाड्खाऊ

सत्तांध पुढारी लाचार-भिकारी
लोकांचा कैवारी कोणी नसे

सत्तेचा पूर पैशाचा पूर
दारूचा पूर भारतामध्ये 

जिथे लाचखोरी पोलीस  करी चोरी
घरातील पोरी सुरक्षित नाही

एवढे  सारे असून खावया नसून
पुढारी म्हणे आता ग्लोबल झालो

आमचीच चूक आम्हालाच त्रास
आम्ही घातली आई निवडून दिले

आशा नोकरीची फुकट पार्टीची
आम्ही घातली आई निवडून दिले

बेरोजगारी निर्मुलन दुष्ट निर्दालन
'रामराज्य' कारण आई घातली

जे दिले निवडून गेलेत माजून
'येडा' म्हणे पाच वर्षे  आता गोट्या खेळा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा