सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

कालचा आकडा लागला नई. हमेशा ट्राय मारतो. काय कराव काळात नाई. ओपनचा लावला त पत्ती लागत नै अन लागल त ज्याक्पोट.

काल लंगडा वर १५ रुपय  लावलं  त टकल्या आला.

ओपन जेऊदीना  अन क्लोज  झवूदीना .

येडं 

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

त मी म्हणू

कि भो हे अस शे.

आते तुम्ही कितला बी काही बी करा काय घन्टा व्हस ?

.....तीन डोयाले पट्टी अन हात म्हा तराजू. अन दोन्ही पाल्डे बरोबर.

म्हणजे त्यांना अर्थ ?

जो पुन्य करी तो त तरी जो पाप करी तो बी तरी

त हाई शे आजच्या कलयुगनी पोझिशन





- येड 

बुधवार, २५ जुलै, २०१२

फ्याशन झालीय खेड्यात्ल्याव केलं कि पिक्चर कल्लात्मक होतो. कलात्मक नसलाबी तरी चालत. 


- येडं    

सोमवार, १६ जुलै, २०१२

देउळ अन गांधीजींची तीन माकड


देउळ  अन  गांधीजींची  तीन  माकड :-  यक समीक्षण ह्या फ्लीमवर 
लौकरच येऊन राहिलंय

- येडं

सोमवार, २५ जून, २०१२

सालं.... ग्लोबलायझेशन ब्येकारे

सालं......ग्लोबलायझेशन ब्येकारे 
....सालं इंडोनेश्यात सुमानी भूकम 
तं हार्डडिस्कचे भाव इंड्यात वाहाडता...

झवला कोण नाव कुणाच ?

मरत कोण दहाव कुणाच ?

सब साले सोयेवाले पडे 
जाग राहा क्या कोई ? 

- येडं

शनिवार, १६ जून, २०१२

पहिला पाउस झाला !
आता बर्याच जणांना मागच्या पावसाचे फोटो 
ह्या वर्षी अपलोड करायचा चान्स मिळेल असं
दिसतंय.

-येडं 

रविवार, ११ मार्च, २०१२

लवकरच ३ तद्दन सिनेमावर वाचू

निवडणुकांचा उद्योग संपला अन महाराष्ट्रात बातम्यांचा दुष्काळ.
आता च्यानेलवाल्या लोकांना विषय मिळालाय : मराठी सिनेमा.

तर लोकोहो, आपुंबी त्यांच्यासार्क करू. अन लवकरच ३ तद्दन सिनेमावर वाचू :

१. देऊळ

२. शाळा

३. बालगंधर्व


आता ह्याच्याव खूप लिहिणारे लीतील पण आपल्या सारख्या खेड्यातल्याच कोण छापणार ?
म्हनुन्सनी लीव्णारे.

:- येडं

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

चाराने आठाणे

उम्ब्र्यात उबा रायलो अन चलनातून बाद झाल्याले
चाराने आठाणे फेकावे तसे दिले शब्दं-अक्षरं भिरकावून

               कचराच तो

किती झाकपाक करून ठिवला तरी
आखीर कचरा कचराच असतो

आता ह्यांची भाषा काळात नाही हल्ली कुणाला
पै-पैश्याची भाषा खरी

ह्या सगळ्या प्रकाराला मी खुद साक्ष आहे.

- येडं

आपुन माणूस असतो माणूस

सरकारी नोकरी माणसाला
षंढ-बुळा-नपुंसक बनवते.

बैल असतो बैल.

घाण्याचा बैल. नुसते फिरा.
गररागारारा--तेल निघतं
का नी पाहायचं नाही ते दुसरे ठरवणार. गररागारारा.

आपुन कचरा असतो कचरा.

तुम्ही तुमच जीपेफ्च बिल टाका..तुम्हाला सांगतात
कारकून कामाला गेलेती माम्बैला तं ते येतीन तव्हाच तुमच काम व्हणार.
तुम्ही बुरगुंडा बैल असतात.
नुस्त जुगायचं...

तुम्ही आर्जव करता तुमची बुद्धी अक्कल माणुसकी मन विवेक घराच्या छपराला टांगता...
तुम्ही स्वताच्या बाप आज्याच्या इज्जतीचा भोसडा उदास करुंसनी हातपाय पडता
"नाना मला लई म्हणजे लैच गरजे" मंग ते तुम्हाला त्यन्च्या झाटावर मारून सांगता...
"आम्हाला अन आमचा कारकुनांना जीपेफ्च कायीच येत नाही तुमचं बिल करणार कस ?
तुम्ही येडझवे शिपाई आम्ही तुम्हाला मानावं कस ? "
तुम्ही गोरेमोरे होतात..
गोगलगाय असतात तुम्ही सरपटणारे
तुम्ही विरोध करायला काई असतच नाही तुम्च्याजोळ
तुमच्या सुसंस्कृत पणाच मढ तुम्ही वाहता...
तुम्ही हात जोडता सहाय्यक अधीक्षकाला...
नव्या लागलेल्या कारकुनाला...तो असतो डबल ग्रेजुएत
तो तुम्हाला इकोनोमी शिकवतो
आपुनच चुत्ये हे पटून देतो.

आपला पाय असतो आता खोलात
इज्जत - मान घातलेला असतो फोद्यात
तुम्ही चिडता वैतागता पण
तुम्ही झाट कोणाचं वाकडं करू शकत नाही वाकडं
तुमचा जू तुम्हाला ताठ उभ राहू देत नाही ताठ
मग तुम्ही मांजर होतात जिची भिंतीला पाठ असते पाठ.

वस्सकन अंगावर जाता तुम्ही ...
तुमची कपडे मळलेले असता लोकासमोर साष्टांग घालून
मग तुम्ही जमीन होतात...स्वताच्या गांडूगिरीला जामीन देतात
मग तुम्ही मावळेच होतात तानाजीचे...परतीचे दोर आता नसतात टांगलेले
घोरपडी परतून गेल्या किल्ल्यात तुम्ही उभे असतात
तुमचा इलाज नसतो इलाज...तुमची छाती असते सन्दुक अन गांड होते बंदूक
तुम्ही निकराने लढाईत उतरता...
जीवानिशी मारणारा पाण्यात हातपाय मारतो तशे तुम्ही
तुम्हाला किंमत नसते किंमत
चुत्ये असता तुम्ही चुत्ये
आपुन फक्त त्यांचे पायच चाटायचे पाय
आपुन माणूस नसतो माणूस
ते तुम्हाला लढू द्याला तयार नसतात..
तुम्ही त्यांचा समोर नागडे असता नागडे
त्यांचा कडे सत्ता असते सत्ता
सहीची...पेनाची...खुर्चीची...
पण आता आपल्याला माज आलेला असतो माज
तुम्ही लढायला मरायला मारायला तयार असता


तुमचा जू तुम्ही मानेवरून काढता
ताठ मानेन उभ राहता
मानेला रग लागलेली असते रग
तुम्ही चव्हाट्यावर आणता त्याची गांडमस्ती
आता परवा नसते
तुमची आधीच पुर्विपास्न मारली गेलेली असते


आपण शहीद असतो उद्याचे शहीद
आपला मुडदा पडणार हे आता आपुन जाणून असतो
पण ते बी खरं नी खरं तं
आपुन कुत्रे असतो रस्त्याव वाढणारे अन मरणारे
आपली घंटा कुणाला कदर नसते
आपलं जगणं मरणं एकच
सांडपाण्यातले किडे आपुन

तरीबी आपुन एक लक्षात ठुतो

शिपाई असू झाट भर
पण कितीबी कायबी झाल तरी
आपुन माणूस असतो माणूस

आता एकदम आपुन माणसात येतो
आपली मान चोळून घेतो
अन उभे राहतो  लढायला भिंतीला पाठ लाऊन
( असली मान्स समोरन वार करत नसतात )


- येडं

( सदर कवितेतील माणसे-घटना-प्रसंग काल्पनिक आहेत. जर कोणाला कोणत्या जीवित प्राणीमात्रांशी साम्य वाटलं तर अर्थातच तो योगायोग समजावा.  - येडं :)  )

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

ह्या दुनयेव

ह्या दुनयेव मुताच एकांदा
जीव खावून

" ह्या काही गोळ्या लिहून देतोय
२/३ दिवस होईल त्रास पण नंतर खडा
निघून जाईल खडा."

मुताचीबी चोरी तरीब्र घचीचमोरी - मुताचीबी चोरी

दुनयेव कसला मुततो
बुल्ली सम्ळून अस म्हणजे झालं.

आपण भले आपली बुल्ली भली.

ह्या दुनयेव मुताच एकांडाव

- येडं

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

आजी थांबलीच एकदम

कालच एक आजी पहिली रस्त्यावर

सायीसारखी मऊ
जन्मताच ती म्हातारी असणार...
                 भरपूर झुऱ्या,सुरकुत्यांची गोधडी अंगावर घेऊन...

मला एकदम मोठ्याने माझी आजी आठवली
मी मांजरीसारखा तिच्यावर प्रेम करायचो....
अजूनसुद्धा

चेहऱ्यावर देवीची ठिपकेदार रांगोळी
तेलाने चापलेल्या केसांची
रूपाय एवढा कुकुवाचा छाप
हातावर बासरीवाल्या कृष्णाची
गोंदण

तुरुतुरुचालीची
कमावलेल्या व्यवहार-वागण्याची
ढ ण ढ ण स्टो पुढं भाकरी थापणारी

आजी हसायची तेव्हा चेर्यावरची रांगोळी विस्कटून जायची

पप्पा पट्ट्याने मारायचे तेवा माझा मार अंगावर घेणारी शूर
घडवंची खाली पीठाने माख्लेलो दिसलो नाही
मी घरात अन दार बंद करून मला गल्लीभर शोधे
घरात येऊन रडत बसे.
           सापडलो कि मग मार मार मारायची अन रडता रडता पप्प्यांची
बाजरीच्या भाकरीचा वरचा पापुद्रा तेल मीठ
दुसऱ्याच्या कार्ट्यानपास्न लपून कायबाय खाय पी

आजी पडली प्यारालीसीस्नी बेडवर
आजी थांबलीच एकदम.

- येडं




शनिवार, २८ जानेवारी, २०१२

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

आज  श्राद्ध साजरं  केलं. ( राष्ट्रीय )

पिंडाला कावळा 

शीव्लाच नाही.

- येडं


मंगळवार, १० जानेवारी, २०१२

वर्ष उलटली पण अजून पत्ता नाही लागला. का आवडतात : वळू - विहीर-नटरंग-हरिश्चंद्राची सारखे फाजील, फालतू, रटाळ पिक्चर आपल्याला.

- येडं

झवाच्या तवा सांगितलेलं बर.

कोटीत किंमत असलेली महागडी चारचाकी घ्यायची तर बँक ५% व्याज लावणार, शेतकरी ट्रक्टर घ्याच म्हणतो तेवा १५% व्याज घेणार.

जय जवान-जय किसान-जय विज्ञान

झवाच्या तवा सांगितलेलं बर.

- येडं


सोमवार, ९ जानेवारी, २०१२

शिंदळकी

सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक  शिंदळकी करणारे मान्यवर लेखक गण,

त्यांना प्रतिष्ठा मिळून देणारे पुरस्कारांचे रद्दीविके,

यांना माझा नमस्कार.

- येडं 

रविवार, १ जानेवारी, २०१२

डोक जड झालंय.

आजच्या सारखं नेहमीच होत आलंय माझं, त्यात विशेष अस काहीच नाही. पूर्वी काही लोक करायचे तसे आता मात्र कमीच झालेत ते सुद्धा.

समजा नसती भाषा तर काय सॉलिडगोची झाली असती माणसाची. विचार करायला पण सोय नसती राहिली. मग आपण काय केल असत याचा राहून राहून विचार येतो. विचार करतो म्हणून तर माणूस झालो आपण. वेगळे झालो, फैलावलो पृथ्वीवर, माजून राहिलोय सगळीकडे, तणा सारखे.

पण आता बदल होतायेत.  टि. व्ही. चेनल्स, पेपर, इंटरनेट यांनी मिळून आपली विचार करायची, सगळ काही स्वताच्या विचारावर,  मत्तेवर पारखून घेण्याची सवय मोडायला सुरुवात केलीय. आपण लाईक करतो, कॉमेंट करतो, रिप्लाय करतो. प्रतिउत्तर हा आपला फंडा झालाय.

प्रश्न विचारणे,पडणे किवा नवीन काही करणे असं न होता react  होण्याचा संसर्ग आपल्याला झालाय.

काही नवीन प्रश्न, पर्याय  ह्या ब्लॉग मधून उद्या पासून सुरु करू.

तोवर

- येडं