गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

चाराने आठाणे

उम्ब्र्यात उबा रायलो अन चलनातून बाद झाल्याले
चाराने आठाणे फेकावे तसे दिले शब्दं-अक्षरं भिरकावून

               कचराच तो

किती झाकपाक करून ठिवला तरी
आखीर कचरा कचराच असतो

आता ह्यांची भाषा काळात नाही हल्ली कुणाला
पै-पैश्याची भाषा खरी

ह्या सगळ्या प्रकाराला मी खुद साक्ष आहे.

- येडं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा