मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

आजी थांबलीच एकदम

कालच एक आजी पहिली रस्त्यावर

सायीसारखी मऊ
जन्मताच ती म्हातारी असणार...
                 भरपूर झुऱ्या,सुरकुत्यांची गोधडी अंगावर घेऊन...

मला एकदम मोठ्याने माझी आजी आठवली
मी मांजरीसारखा तिच्यावर प्रेम करायचो....
अजूनसुद्धा

चेहऱ्यावर देवीची ठिपकेदार रांगोळी
तेलाने चापलेल्या केसांची
रूपाय एवढा कुकुवाचा छाप
हातावर बासरीवाल्या कृष्णाची
गोंदण

तुरुतुरुचालीची
कमावलेल्या व्यवहार-वागण्याची
ढ ण ढ ण स्टो पुढं भाकरी थापणारी

आजी हसायची तेव्हा चेर्यावरची रांगोळी विस्कटून जायची

पप्पा पट्ट्याने मारायचे तेवा माझा मार अंगावर घेणारी शूर
घडवंची खाली पीठाने माख्लेलो दिसलो नाही
मी घरात अन दार बंद करून मला गल्लीभर शोधे
घरात येऊन रडत बसे.
           सापडलो कि मग मार मार मारायची अन रडता रडता पप्प्यांची
बाजरीच्या भाकरीचा वरचा पापुद्रा तेल मीठ
दुसऱ्याच्या कार्ट्यानपास्न लपून कायबाय खाय पी

आजी पडली प्यारालीसीस्नी बेडवर
आजी थांबलीच एकदम.

- येडं




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा